सेंट अँन्स हायस्कुलने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

32

जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात स्थानिक सेंट अँन्स हायस्कुलने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा प्रभात हितेंद्र कोकाटे हयाने 96.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मनस्वी संतोष गुंडावार आणि दिर्घायुष्यी कर्मवीर भुरसे हया दोघींनी 95.20 टक्के गुण मिळवून द्वितीय आल्या असून अजींक्य पद्माकर निंबेकर हा विद्यार्थी 95 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.

विद्यालयातील 38 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून 3 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 23 विद्याथ्र्यांनी 90 टक्केच्या वर गुण प्राप्त केले आहे.

स्थानिक नवभारत कन्या विद्यालयानेही 96 टक्के निकाल देवून उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाची आस्था प्रमोद सहारे हीने ८७.८० टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम आली आहे. नंदीनी बंडु भोयर आणि आचल राजेश वाढई यांनी ८६.८० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या तर प्राची संजय कामडे हीने ८१.४० टक्के गुण मिळवुन तिसरी आली आहे.

स्थानिक नवभारत विद्यालयाचा निकाल ९८.७१ टक्के लागला असुन विद्यालयाचा संस्कार राकेश पेदुरवार याने ८९.८० टक्के गुण मिळवुन प्रथम आला आहे. अथर्व सुनिल लठ्ठे याने ८७.२० टक्के गुण मिळवुन दुसरा तर पार्थ संतोष चिटलवार याने ८३.६० टक्के गुण मिळवुन तिसरा आला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मातापित्यासह गुरूजणांना दिले आहे.