जनसेवा विद्यालयाची शालांत परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

41

दि. 17 जून 2022     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत(ssc) जनसेवा माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थांना भरघोष यश.
शैक्षणिक सत्र 2021-22 मधील शालांत परीक्षेचा निकाल दि 17 जुन 2022 ला दुपारी 1:00 जाहीर झाला. चंद्रपूर जिल्हयातील पोभूर्णा तालूक्यातील दिघोरी जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी शाळेचा एकूण निकाल 94.44% लागला. परीक्षेला बसलेल्या 37 विद्यार्थ्यां पैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यापैकी 20 मुले प्रथम श्रेणीत आहेत.सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे
जनसेवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी उपाध्यक्ष आदरणीय श्री. विनोदभाऊ अहिरकर आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच सर्वाना समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.💐💐💐
यामध्ये प्रथम क्रमांक अनुक्रमे दोन विद्यार्थिनींचा आलेला आहे
कु. तनवी गजानन सोनटक्के (93%) व कु. कांचन युवराज व्याहाडकर (93%)
द्वितीय क्रमांक
कु. आचल दिलीप काटवले (90%) तर तृतीय क्रमांक
कु. श्वेता राजेंद्र वाकुडकर(89.20%)
सर्व शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. मनोज अहिरकर सर आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीसुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐💐