मीच नोंदविणार माझा पिकपेरा या ई पीक पाहणी अंतर्गत शेतक-यांना सहकार्य करणार

32

कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशातील शेतक-यांची प्रगती होवून त्यांना समाधानी जीवन जगता यावे यासाठी कृषी विषयक अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान, बिजप्रक्रिया, हिरवळीचे खत व सेंद्रीय शेती पध्दतीची माहीती शेतक-यांपर्यंत पोहोचवावी. असे आवाहन स्थानिक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. विष्णुकांत टेकाळे यांनी केले.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत २०१८-१९ या शैक्षणीक सत्रापासून तालुक्यातील सोमनाथ येथे कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालयातील प्रथम तुकडीमधील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव वर्गांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजीत तीन दिवसीय अभिमुख सत्रात डाॅ. विष्णुकांत टेकाडे बोलत होते.
डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सहयोगी प्राध्यापक डाॅ. विलास साखरकर यांच्या प्रस्तावनेनंतर कार्यक्रम अधिकारी डाॅ. एस.डी. सरनाईक आणि डाॅ. दिनेश नवलकर यांनी कार्यानुभव उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विस्तार, किटकशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी अभियांत्रीकी आदि विषयतज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राबविण्यांत येणा-या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील एकुण ४७ विद्यार्थ्यांपैकी १८ मूली या कृषी संशोधन केंद्र सिदेंवाही आणि २९ मूल कृषी संशोधन केंद्र वरोरा येथील एकार्जुना येथे कार्यानुभवाचा अभ्यासक्रम पुर्ण करणार आहेत. या अंतर्गत विद्यार्थी निवड करण्यांत आलेल्या गांवातील शेतक-यांच्या शेतीवर २० आठवडे प्रत्यक्ष शेती आणि शेती आधारीत ईतर उद्योग यासंबंधी अभ्यास करतांना बिजप्रक्रिया, माती प्रशिक्षण, जैविकशेती पध्दती, खतांचा संतुलित वापर, किड नियंत्रण याशिवाय कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत केलेल्या विविध पिकांच्या उन्नत वाण, कृषी अवजारे याची माहिती आणि महसुल आणि कृषी विभागाच्या वतीने राबविण्यांत येत असलेल्या माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा या ई पीक पाहणी अंतर्गत शेतक-यांना सहकार्य करणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी रविंद्र घोगरे यांनी तर सोहम रागीठ यांनी आभार मानले. सत्राच्या यशस्वीतेसाठी मंथन बिसेन, कुणाल कुरहाटकर, रोहन गोखरे, नबील आशार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यानुभव दरम्यान कृषी संशोधन केंद्र एकार्जुना मार्फत शेतकऱ्यांना विद्यापीठ निर्मित कपाशीच्या सुवर्ण प्रभा या वाणाच्या बियाण्यांचे पिक प्रात्याक्षिका करीता कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डाँ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी तुलाना, जामखुर्द आणि चिनोली येथील शेतकरी उपस्थित होते.