आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 

42

शिक्षण झाल्या झाल्या नोकरी हवी आहे तर मग कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ‘आयटीआय’. 

सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme)  २०22  सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑन लाईन प्रवेश अर्ज सादर करावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

पालक व विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी

करण्यात येणार आहे. आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेत राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेशअर्ज शुल्क भरण्यास १७ जूनपासून सुरुवात होईल. २२ जूनपासून पहिल्या फेरीसाठी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करता येईल, तसेच संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम सादर करता येईल.