सेवा सहकारी संस्था नांदगाव च्या अध्यक्षपदी प्रकाश आंबटकर तर उपाध्यक्षपदी संदीप रायपल्ले

23

विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित नांदगाव-गोवर्धन च्या संचालक मंडळाची निवडणूक दि.22 मे ला पार पडली.  दि.15 जून ला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश यशवंत ऑबटकर तर उपाध्यक्षपदी संदीप शंकर रायपल्ले  यांची अविरोध निवड झाली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक प्रशांत बांबोळे, सुनंदा सुनील काळे, सखुबाई गुडडी गम्पलवार, गंगाधर कवडू शिंदे. प्रभाकर अन्नलवार,सदाशिव मशाखेत्री, वसंत मोहूर्लें, नीलकंठ नरसपुरे. अशोक उमक, मंदाबाई लाकडे, त्रिमूर्ती नाहगमकर सर्व उपस्थित होते.नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेस नेते संतोषसिह रावत यांचे नेतृत्वात, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती सभापती घनशाम येनूरकर यांचे मार्गदर्शनात, पंचायत समितीचे माजीउपसभापती दशरथ वाकुडकर आणि नांदगावचे माजी उपसरपंच प्रशांत बांबोळे यांच्या सहकार्याने सेवा सहकारी संस्था नांदगावचे सर्वच्या सर्व13 पैकी 13 जागा जिंकत विजय मिळविला होता. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यातआले.

निवडणुकीत नांदगाव च्या सरपंच हिमानी वाकुडकर, उपसरपंच सागर देऊरकर , जोगेश्वर मोरे, गंगाराम चलाख. सारंग भंडारे उमेशअल्लीवार , समीर काळे, नाजूक लाकडे. संदीप शिंदे आदींनी परिश्रम घेतले.