शूर बैलाने वाघाला दिली हुसकावणी, जखमी बैल घरी पोहचला, चिचाळा येथील घटना

26

मूल प्रतिनिधी  :-   तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाने आज बैलावर हल्ला केला. मात्र हा हल्ला शूर बैलांनी वाघाला हुसकावणे देत परतवून लावला व जखमी अवस्थेत घरी पोहोचला. गुराख्यांनी ही बातमी गावात सांगताच बैलाला पाहायला गावात तोबा गर्दी उसळली.
ही घटना आज दुपारी अडीच वाजता चे दरम्यान घडली.
चिचाळा येथील संतोष लेनगुरे यांच्या मालकीचा पांढरा रंगाचा हा बैल असून, दुपारी चरण्यासाठी व पाणी पिण्यासाठी नवीन तळ्याजवळ गेला. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने या बैलावर हल्ला केला. मात्र बैलानेही तेवढ्याच ताकदीने आपल्या शिंगाचा वापर करीत वाघाला परतवून लावले. या घटनेत बैलाचे मानेवर जबर जखम झाली आहे. जखमी अवस्थेत बैल घरी परतल्यानंतर बैलाच्या शौर्याचे कौतुक केले जात आहे.