मूल येथील लोकप्रिय तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी दिला गोंडवाना विद्यापीठाला तीन लाखाचा धनादेश मातापित्याच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्णपदकाची घोषणा

44

सामाजिक बांधिलकी जोपासत येथील तहसिलदार यांनी मातापित्याच्या नांवाने सुवर्ण पदक पुरस्कार देण्यासाठी गोंडवाना विद्यापीला तीन लाखाचा निधी देवुन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला आहे.
स्वर्गीय आई-वडीलांच्या इच्छेखातर मूल येथील लोकप्रिय तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन समाजाचे नांव मोठे व्हावे. हा दृष्टिकोन समोर ठेवुन शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासुन गोंडवाना विद्यापीठाच्या बि.एस्सी. च्या अंतीम वर्षात अनुसुचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थींनीला स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांच्या नावाने सुवर्ण पदकासाठी १ लाख ५० हजार रूपये तर स्व. साधुजी पाटील होळी यांच्या नावानी बि.एस्सी.

विज्ञान आणि मानवतावादी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थींना सुवर्ण पदक देण्यासाठी १ लाख ५० हजार असा एकुण ३ लाख रूपयांचा धनादेश गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांना स्वाधीन केला.
स्व. साधुजी पाटील होळी यांचे इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण झाले, मात्र आर्थीक अडचणीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही, परंतु कुटुंबातील प्रत्येकाने उच्च शिक्षण घेतले पाहीजे. यासाठी त्यांची धडपड सदैव होती.

त्यांच्याच धडपडीचा वारसा जोपासत तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी शिक्षणात हुशार असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचे उद्देशाने वडील स्व. साधुजी पाटील होळी आणि आई स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांचे नावाने सुवर्ण पदक प्रदान करण्याचा निर्धार केला असुन त्यांनी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांच्याकडे ३ लाखाचा धनादेश सुपुर्द केला.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाँ. कावळे, त्यांचे आमदार असलेले काका डाँ.देवराव होळी, विद्यापीठाचे डाँ. नरेश मडावी आणि चलाख उपस्थित होते, सुवर्ण पदकाच्या राशीशिवाय आर्थिक अडचणीमूळे उच्च शिक्षणापासुन वंचित राहणाऱ्या अनुसुचित जमातीच्या पाच विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा मनोदय डाँ. रविंद्र होळी यांनी यावेळी व्यक्त केल्याने विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डाँ, बोकारे यांनी तहसिलदार डाँ. होळी यांचेप्रती आभार व्यक्त केले.