मुल नगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज,10 प्रभागामधून 20 नगरसेवक निवडले जाणार

39
मुल:- नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसुचित जाती( महिला) अनुसुचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी सोमवारी आज सभागृहात सोडत काढण्यात आली.
नगरपालिकेतील लोकप्रतिनिधीचा पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने मुल नगरपालिकेत सध्या प्रशासन राज आहे.
आगामी सार्वत्रिका निवडणुका लक्षात घेता निवडणुक आयोग आणि वरिष्ठांच्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून मुल नगरपालिका प्रशासनाने लोकसंख्येच्या आधारे एकुण 10 प्रभागाचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार केला आहे.
मूल नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
मूल नगर परिषदेचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले असून, मूल नगर परिषदेचे प्रशासक तथा मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर, प्रभारी मुख्याधिकारी मनिषा वजाळे यानी मूलचे राजकीय पदाधिकारी यांचे समक्ष हे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले.
नगर परिषदेचे पूर्वी 8 प्रभाग होते, आता 10 प्रभागामधून 20 नगरसेवक निवडले जाणार आहे.  शासनाने मूल नगर परिषदेच्या नव्या प्रभाग रचनेला नुकतीच मान्यता दिली असून, या प्रभागातील राखीव संवर्गाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.
नगर परिषदेच्या एकूण 20 जागापैकी 10 महिला आरक्षीत जागेत अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, सर्वसाधारण महिला 7 जागा आरक्षीत करण्यात आलेल्या आहेत.
उर्वरित 10 जागापैकी अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1 खुला सर्वसाधारण 8 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
अनुसूचित जाती महिला राखीव मध्ये प्रभाग 8 अ, प्रभाग 9 अ, अनूसुचित जमाती महिला राखीव प्रभाग 1 अ, अनुसूचित जाती सर्वसाधारण 10 अ,  अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रभाग 7 अ मध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्यात.
सर्वसाधारण महिला राखीव प्रभाक 2 अ, प्रभाग 3 अ, प्रभाग 4 अ, प्रभाग 5 अ, प्रभाग 6 अ, प्रभाग 7 ब, प्रभाग 10 ब या प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेत.

आजच्या सभेसाठी मूल नगर परिषदेचे माजी पदाधिकारी, कॉंग्रेस, भाजपा, आम आदमी पार्टी सह अन्य राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.