मूल येथील उप – जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

42
मुल (प्रतिनिधी)    
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गुरुवार दि. ०९ जून २०२२ रोजी मूल येथील उप – जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
    यातलाच एक भाग म्हणून न्यासातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले .
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  सौ . अर्चना येनुरकर  आणि सौ . माधवी येलंकीवार  यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर आणि रोहीत येलंकीवार  यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
    या उपक्रमाचा लाभ एकूण ४३ रुग्णांनी घेतला .