मूल ब्लॉक राजोली क्लस्टर मधील केंद्र सरकार पुरस्कृत ,शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन.

28

मुल(प्रती) आज दिनांक ०७/०६/२०२२ ला मूल ब्लॉक राजोली क्लस्टर मधील केंद्र सरकार पुरस्कृत १०,००० FPO SFAC व कृषि विभाग( आत्मा) आणि विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून शेतकरी उत्पादक कंपनी राजोली कार्यालयाचे उदघाटण सोहळा आज पार पडला.

त्यात उदघाटक मा. गायकवाड तालुका कृषी अधिकारी, मा.करकीले सर कृषि सहायक, मा. भानसे सर प्रकल्प समन्वयक ( विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी) मा. नागपुरे सर जिल्हा समन्वयक (विकासगंगा समजासेवी संस्था घाटंजी) उपस्थित होते. कंपनीचे संचालक मंडळ, राजोली क्लस्टर मधील येणाऱ्या गावातील शेतकरी, शेअर्स सभासद, मोठ्या संख्येने उपस्तीत होते.