दिव्यांग व्यक्तींकडून स्वयंचलित तीनचाकी सायकलकरीता अर्ज आमंत्रित

28

चंद्रपूर, दि. 7 जून : जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तीकरीता स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरवठा करावयाचा असल्याने जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण कार्यालय,चंद्रपूर येथून प्राप्त करावे व स्वयंपूर्ण भरलेले अर्ज दि.24 जून 2022 पर्यंत या कार्यालयात सादर करावे.

याकरीता, लाभार्थ्यांकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडचे दिव्यांग प्रमाणपत्र (40 टक्केपेक्षा जास्त), वय वर्षे 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याचे आधारकार्ड,

शाळा सोडण्याचा दाखला अथवा जन्म दाखला,

रहिवासी दाखला तसेच

वैद्यकीयदृष्ट्या तीनचाकी स्वयंचलित सायकल हाताळण्यास सक्षम असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तरी, जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.