अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार , एक गंभीर

56

मूल,

सिलेंडर भरून आणण्याकरिता मोटार सायकल क्रमांक M H १२ E Y – ७३११ ने एम आय डी सी आकापुर येथील गोडाऊन मधून सिलेंडर भरून मित्रासोबत सकाळी १०- ० ० वा. चे दरम्यान मूल – गडचिरोली या हायवे मार्गाने येत असताना एका अज्ञात बोलेरो पीक अप वाहनाने उमा नदी पुलाच्या जवळ असलेल्या मोडीवर धडक दिल्याने मूल वॉर्ड क्र. चीचाळा रोड येथील रहिवासी आदित्य काळबंधे वय २२ वर्षे याचा जागीच मृत्यू झाला.तर. सोबत असलेला मित्र बंटी अलगुनवार २३ वर्षे हा गंभीर जखमी झाला.

हे कळताच मूल पोलिस स्टेशनचे ट्रापिक पोलिस , व कर्मचारी रस्त्याच्या प्रवाशांच्या मदतीने दोघानाही मूल येथील उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आले.त्यात आदित्य काळबांधे याला डॉक्टरने मृत घोषित केले,तर सहकारी मित्र प्रसाद ( बंटी ) अलगुनवार याला गंभीर जखम असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

         सादर अज्ञात वाहन चालक याने दोन तीन प्रवाशांना धडक दिल्याचे सांगण्यात आले.दोन व्यक्ती पुन्हा किरकोळ जखमी मूल येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. सहा.पोलिस निरीक्षक सतीश बनसोड यांच्या मार्गदर्शनात पी एस आय डोंगरे हे अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.अज्ञात वाहन चालक विरुद्ध कलम २७९,३३८, ३०४ ‘अ’ भा द वि,R W – १८४, १३४ मो वा का गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.