मुल इकोपार्क येथे पर्यावरणदिनी वृक्षारोपण

60

मुल – जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने वनविभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालय चीचपल्ली आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मुल व पर्यावरण प्रेमी संजीवन संस्था, अ.भा. ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुल इकोपार्क येथील विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. वनराईच्या सानिध्यात ५ जून २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या नेतृ त्वात सर्व सहभागी संस्थांचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्याहस्ते इको पार्क परिसरात विविध वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्ष संवर्धन व पर्यावरनाचे महत्व याविषयावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे तालुका अध्यक्ष मीरा शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा उपाध्यक्ष अल्का राजमलवार यांनी मानव व वन्यप्राणी यांच्यासाठी वृक्षाचे महत्व यावर उपयुक्त माहिती दिली.

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षाचीही संख्या वाढली पाहिजे या उदात्त हेतूने चंद्रपूर वनविभाग चीचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी जागतिक पर्यावरण दिनात सहभागी झालेल्या सर्व संस्थांच्या पदाधिकारी सदस्य यांना एक व्यक्ती-एक झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आव्हान करुन आपल्या हस्ते सिडबालचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेफडो नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, संजीवनी संस्थेचे अध्यक्ष पर्यावरण प्रेमी उमेश झिरे,

ग्राहक पंचायततचे अध्यक्ष दीपक देशपांडे, अॅड सागर मुदमावार,प्रा.प्रमोद मशाखेत्री,चैखुुंडे मॅडम,ज्येष्ठ नागरीक

मुल क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, ना.वी. सहसचिव गुरुदास चौधरी, उपाध्यक्षा ललिता मुस्कावार, सचिव कविता मोहूर्ले, युवा उपाध्यक्ष राकेश ठाकरे, जिल्हा अध्यक्षा सुषमा कुंटावार, तालुका संघटिका सुनीता खोब्रागडे, नंदा शेंडे, स्मिता बाडगे, रेखा पोकडे, देवगडे सर, यांचेसह संजीवनी संस्थेचे सर्व पदाधिकारी,ग्राहक पंचायतचे पदाधिकारी सदस्य, नेफडोचे अनेक तालुका संघटिका, व चीचपल्ली वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक घागरगुंडे यांनी केले. यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.नागरीकांनी या रोपट्यांची लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली. अल्पोपहार व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.