प्राचार्य रडके यांना भावपुर्ण निरोप

48

नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालय व व्यावसायीक शिक्षण महा. चे प्राचार्य श्री. डी.एल.रडके हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने आयोजित निरोप समारंभातून त्यांना भावपुर्ण निरोप ंदेऊन सत्कार करण्यात आला. शि.प़.मंडळाच्या राजोली,मूल,अंतरगावातील विवीध शाखांमधून 32 वषॉचे प्रदिर्घ सेवेनन्तर् श्री.रडके दिनांक 31 मे रोजी निवृत्त झाले आहेत.

या निरोप समारंभ प्रसंगी प्रा.किसान वासाडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.महेश पानसे,प्रभाकर धोटे,श्री.मुंडरे,हेमन्त सुपनेर,श्री.मोडक,सुनील नागपूरे यांचेसह शिक्षक,प़ध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित शिक्षक,प्राध्यापक यांनी श्री.रडके यांना निरोप देऊन भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे संचालन करून आभार शिक्षक श्री.मोडक यांनी केले.