भाग्यश्री महीला पत संस्थेच्या नवीन कार्यकारीणीची अविरोध निवड

33

अध्यक्ष पदी अनिता मोगरे यांची तर मानद सचिव म्हणुन अल्का कामडी…

 

आँडीट वर्ग अ मध्ये असलेली तालुक्यातील एकमेव संस्था म्हणुन ओडखल्या जाणारी स्थानिक भाग्यश्री महीला नागरी सहकारी पत संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिता मोगरे यांची तर मानद सचिव म्हणुन अल्का कामडी यांची नुकतीच अविरोध निवड झाली. जयश्री चन्नुरवार यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी आर.डी.कुमरे यांचे उपस्थितीत पार पडलेल्या संस्थेच्या संचालकवृंदात स्मिता कामडे, मिरा कामडे, ज्योती भांडेकर, सिंधु पुप्पलवार, स्मिता गुरनुले, सोनल कोकाटे, रजनी येनुरकर आणि वनमाला रामटेके यांची संस्थेच्या मतदार सभासदांनी एकमताने निवड केली, संस्थेचे हित आणि प्रगतीसाठी सभासदांनी विश्वास दर्शवुन एकमताने निवड केल्याने नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांनी संस्था आणि ग्राहकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पत संस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिका-यांनी संस्थापक सल्लागार अनिल मोगरे यांचे उपस्थितीत अलीकडेच पदभार स्विकारला, यावेळी संस्थेच्या कर्मचारी वृंदानी पदाधिका-यांचे स्वागत केले.