मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली पोलिस प्रशासन मूल पोलिसांना मिळाले यश

31
मूल :- तालुक्यातील सोमनाथ मार्गावर कोसंबी येथे गुरनुले यांच्या शेतशिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती नागरिकांनी मूल पोलिसांना दिली. मूल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला. काही वेळातच मूल पोलिसांनी त्या अज्ञात मृतदेहची ओळख पटवली.
मृतकाचे नाव मार्कंडेय रामप्रसाद  सोणुले  वय वर्ष 50 असून मुल येथिल वार्ड क्रमांक 14 चे रहिवासी आहे. मार्कंडेय हा वेडसर वृतीचा आल्याची माहिती असून तो काही दिवसाआधी घरून निघून गेला होता.
मात्र रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थीतीत आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करुन उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांचा स्वाधिन करण्यात आले.
मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गायकवाड आणि मूल पोलीस तपास केले.पोलिसांनी अगदी काही तासांतच मृतकाची ओळख पटवण्यात यश मिळविले आहे.