कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज आमंत्रित

25

कृषी यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पेरणी यंत्र तसेच सर्व पिकांचे लागवड यंत्र,

चाफकटर, नांगर, फवारणी यंत्र, रिपर, जमीन सपाटीकरण यंत्र, खोडवा कटर, पाचट कट्टी यंत्र, मल्वर, मळणी यंत्र, डाळ मिल, सोलर ड्रायर व इतर विविध शेती औजारे,

ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, कांदाचाळ शेडनेट, पॉलीहाऊस, रायपनिंग चेंबर कोल्ड स्टोरेज, शेततळे अस्तरीकरण बी- बियाणे अनुदानावर लाभ घेण्यासाठी

महा ई-सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, येथे महाडीबीटी या संकेतस्थळावर ३० मे २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरावेत,

सारांश

  • कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.

उद्देश :

  • जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.

 

  • प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

धोरण :

  कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

अनुदान

  • या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

१) ट्रॅक्टर२) पॉवर टिलर३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे४) बैल चलित यंत्र/अवजारे५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे६) प्रक्रिया संच७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान८) फलोत्पादन यंत्र/अवजारे९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे१०) स्वयं चलित यंत्रे

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:  १) कृषि अवजारे बँकेची स्थापना  २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना*लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.

पात्रता

 •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
 •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
 •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
 •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
 • उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील


आवश्यक कागदपत्रे

 •  आधार कार्ड
 •  ७/१२ उतारा
 •  ८ अ दाखला
 •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
 •  स्वयं घोषणापत्र
 •  पूर्वसंमती पत्र