संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 108 प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना मोठा दिलासा राकेश या.रत्नावार,अध्यक्ष

204

संजय गांधी निराधार योजना समिती

आज दिनांक 26/05/2022 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश या.रत्नावार,अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन श्रावणबाळ योजना -29,वृध्दपकाळ योजना-53, संजयगांधी निराधार योजना-20,इंदिरागांधी विधवा योजना -05 व इंदिरा गांधी अपंग-01 असे एकूण 108 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे अर्ज प्रलंबित राहणार नाही याद्ष्टीने समितीची नियमीत सभा घेवून अर्ज मंजूर करण्यांचा पूर्णपणे प्रयत्न करित असून यापुर्वी समितीने दिलेला शब्द पाळीत आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल असून केसेस प्रलंबीत राहणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्यांत येत आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या केसेसचा निपटारा करण्यांत आलेले असून चालू अर्ज सुध्दा दरमहा मिटींग आयोजित करण्यांत येऊन मंजूर करण्यांत येत आहे. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे.याऊपरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
शासनाकडून अनुदान मिळण्यांस विलंब होत असल्यामूळे समितीच्या अनुदान तात्काळ मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यांत आला त्यात समितीला यश येऊन सर्व लाभार्थ्यांना त्यांचे खात्यांत अनुदान नियमीत जमा करण्यांत येत आहे.
तसेच, बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यांत येऊन लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार यांची दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यांत आलेल्या आहेत. तरी बँकेच्या व्यवहारात कांही अडचणी उद्भवल्यास तात्काळ संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष व सदस्यांशी संपर्क साधावा. समितीचे वतीने लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याकरिता प्रयत्नशिल आहे.
तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य,श्री.गंगाधर कुनघाटकर, श्री.सत्यनारायण अमदुर्तीवार, श्री.भोयर, नगर परिषद कर्मचारी व श्री.गीरडकर,क.लिपीक उपस्थितीत होते.