राज्य सरकारने तातडीने अबकारी कर व वॅट कमी करावा

30

पेट्रोल डिझेल स्वस्त करुन ग्राहकांना दिलासा द्यावा   अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर ची मागणी.
चंद्रपूर प्रतिनिधी.
राज्य सरकारने त्यांच्या वक्तव्यावर कायम राहात प्रत्यक्ष करात कपात करावी त्यामुळे पेट्रोल डिझेल च्या किंमती कमी होण्यासाठी मदत होईल. असा सूर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर चमू घ्या गृप चॅट चर्चेतून पुढे आला व या अनुषंगाने एक ठराव पारित करण्यात आला.
ठराव:- ग्राहक हित जोपासण्यासाठी तातडीने राज्य सरकारने आपल्या माध्यमातील वक्तव्यानुसार जर कर कमी केले तर ताबडतोब त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला केवळ पेट्रोल डिझेल च्या किंमतीत च नाही तर प्रत्यक्षात इतरही वस्तुंच्या किंमती कमी होण्यासाठी प्रेरक होऊन महागाई वर बराच अंकुश लागणार आहे.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्ह्यातर्फे, जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, जिल्हा संघटक, दीपक देशपांडे, महिला आघाडी च्या किरण साळवी, राजेश कावलकर, प्रभात कुमार तन्नीरवार,अनिल कंठिवार तुळशीराम बांगरे यांचे तर्फे करण्यात येत आहे.
ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्ह्याच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन विदर्भ प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे, सचिव, नितीन काकडे आणि प्रांत संघटक अजय गाडे यांनी केले असून ग्राहक हितासाठी या मागणीचे समर्थन करीत प्रांताचीही अशीच मागणी आहे हे स्पष्ट केले आहे.