पेट्रोल डिझेल वर केंद्र सरकारने दिलेल्या सवलतीचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत व चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीतर्फे स्वागत

33
 चंद्रपूर  /प्रतिनिधी 
: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात केलेल्या अनुक्रमेसाडेनऊ आणि सात रुपयेकपातीमुळे ग्राहकांना दिलासामिळाला आहे याचे अखिलभारतीय ग्राहक पंचायतीने जोरदार स्वागत केले आहे. सोबतच राज्य सरकारनेही अबकारी दरात कपात करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी अखिल भारतीयग्राहक पंचायतीने केलेली आहे.केंद्र सरकारने दोन वेळा राज्य सरकारांना पेट्रोलियम पदार्थजीएसटी दरात आणण्याचे किंवाअबकारी दरात कपातीचे धोरणस्वीकारण्याचे आवाहन राज्यांनाकेले होते.सरकारने उज्वला योजनेतीलग्राहकांना घरगुती गॅस मध्ये दोनशेरुपये सूट दिली आहे त्याबाबतहीग्राहक पंचायतीने स्वागत केलेआहे, सोबतच साधारण ग्राहकांचा त्यासंदर्भात विचार व्हावा अशी मागणीही केली आहे. 
राज्य सरकारने डिझेल पेट्रोल दर कपात केल्यास राज्यातील ग्राहकांना इतरत्रही जीवनावश्यक वस्तू कमी दरात प्राप्त होतील कारण वाहतुकीचे दर कमी झाल्यास त्याचा प्रभाव सर्व संबंधित वस्तूवरही पडतो केंद्र सरकार ने या संदर्भाने पेट्रोल आणि डिझेल कपातीचे धोरण स्वीकारलीअसल्याचे म्हटले आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली भाववाढ जनहितासाठी कार्य करणाऱ्या सरकारने काही प्रमाणात स्वीकारायला हवे हे सर्वांनाच मान्य आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने १५ मे रोजी एक स्वतंत्र आदेश काढले असून विधवांना सन्मानाणे वागणूक मिळावी म्हणूनराज्यातील सर्व ग्रामपंचायतीनीशासन निणयाप्रमाणे ठरावघ्यावा. याबाबत राज्य सरकारनेकौतुकास्पद धोरण अवलंबूनर्वांना दिलासा दिला आहे त्याचेही स्वागत ग्राहक पंचायतीने केले आहे आणि पुनश्च एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कपातकरण्याची मागणी केली आहे.काही राज्यांनी त्यासाठी नकार दिला तर काही राज्यांनी ते
मान्य केल्याने त्या त्या राज्यातीलनागरिकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याने यासंदर्भातकुठलीही भूमिका घेतली नव्हतीआता राज्य सरकारने डिझेलपेट्रोल वरील दरात कपात केल्यास राज्यातील ग्राहकांनाही दिलासा मिळेल असे ग्राहक पंचायतीचे प्रांतअध्यक्ष नारायण मेहरे, प्रांत संघटन मंत्री अजय गाडे यांनी म्हटले आहे.हीच मागणी स्वतंत्र पणे चंद्रपूर जिल्हा ग्राहक पंचायत ने उचलून धरत त्याचा पाठपुरावा ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, नगरपरिषदांनी ठराव करुन सर्वसामान्य माणसाला,व विशेष करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जिल्हा अध्यक्ष, पुरुषोत्तम मत्ते , जिल्हा संघटक, दीपक देशपांडे, महिला आघाडी प्रमुख, नंदिनी चुनारकर व संगीता लोखंडे यांनी केली आहे व समस्त जिल्हा पदाधिकारी यांनी या  निर्णयाचे स्वागत केले आहे.