नांदगांव सेवा सहकारी संस्थेवर रावत यांचे नेतृत्वात काँग्रेस प्रणीत आघाडी विजयी

79

मूल : तालुक्यातील मोठ्या सहकारी संस्थेपैकी एक असलेली नांदगांव येथील सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसप्रणीत ग्राम विकास शेतकरी आघाडीने तेराही जागेवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात आणि पं.स.चे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर आणि मजुर सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत बांबोळे यांचे नेतृत्वात संस्थेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ग्राम विकास आघाडी निर्माण करण्यात आली. सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात ग्राम विकास शेतकरी आघाडीचे प्रशांत बांबोळे, प्रकाश आंबटकर, प्रभाकर अनलवार, सदाशिव म्हशाखेञी, वसंत मोहुर्ले, निलकंठ नरसपुरे, संदीप रायपल्ले आणि अशोक उमक विजयी झाले, महीला राखीव गटात ग्राम विकास आघाडीच्या सुनंदा काळे आणि सखुबाई गंपलवार, विमुक्त जाती भटक्या जमाती वि.मा.प्र. गटात गंगाधर शिंदे आणि अनुसुचित जाती जमाती गटात मंदाबाई लाकडे विजयी झाले. इतर मागास प्रवर्गात ग्राम विकास आघाडीचे ञिमुर्ती नाहगमकर अविरोध विजयी झाले. काँग्रेस प्रणीत ग्राम विकास आघाडीच्या तेराही उमेदवारांनी जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर आणि भाजपाचे निलेश मगनुरवार यांचे नेतृत्वात निर्माण करण्यात आलेल्या शेतकरी विकास आघाडीच्या तेराही उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. निवडणुकीत २४८ मतदारांपैकी २१० मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. काँग्रेस प्रणीत उमेदवारांच्या विजयासाठी सरपंच हिमाणी वाकुडकर, सागर देऊरकर, केतन जाधव, उमेश अल्लीवार, राकेश देऊरकर, मल्ला अल्लीवार, विनोद नरसपुरे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.