पेपर मिलच्या बांबु डेपोला भिषण आग

43

बल्लारपूर (प्रतिनिधी)  :-

प्राप्त माहितीनुसार दुपारी 4 च्या सुमारास बांबु डेपोला आग लागली व काही कळण्याच्या आत ही आज पसरू लागली. आज लागल्याचे लक्षात येताच बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर तसेच काही उद्योगांच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आग इतकी पसरली की अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणणे जिकरीचे ठरत आहे.

भारतातील सर्वात मोठा असलेल्या बल्लारपूर पेपर मिल (बिल्ट) च्या कळमना येथील बांबु डेपोला दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग लागली असुन ह्या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. 3 दिवसांपूर्वी मुल तालुक्यातील अजयपुर येथे लाकडांचा ट्रक व डिझेल टँकर च्या अपघातात लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पेपर मिलच्या बांबु डेपोला आग लागण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.