चंद्रपूर-मूल महामार्गावर बीटाची गाडी व डिझेल टँक एकमेकांवर आदळून भीषण आग

28

चंद्रपूर : मूल मार्गावरील अजयपूर जवळील रिव्हरव्ह्यू जवळ बीटाची गाडी व डिझेल टँक एकमेकांवर आदळून भीषण आग लागली. यामध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

रात्री वाताच्या १०.३० सुमारास ही घटना घडली. या वाहनात चालकांशिवाय पुन्हा काहीजण आगीत होरपळल्याची चर्चा होती, मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

रात्री उशिरापर्यंत दोन्ही वाहने जळत होती. मूल व चंद्रपूरकडे जाणारे मार्ग बंद झाले. दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी पोलीस व आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले होते.