चिखली येथील पुर्ववत आधार केंन्द्र सुरू-संचालक पराग खोब्रागडे

49

मुल:-आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतातील एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही, तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी लाभांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. या आधार कार्डमध्ये सर्व महत्वाची माहिती साठवलेली असते. मुलांच्या प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो. अपडट करा आधार काड अनेक वेळा असे घडते की, तुम्हाला आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख बदलावी लागते किंवा नवीन आधार कार्ड बनवावे लागेल. हे आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते.

तालुक्यातील चिखली,राजोली,डोंगरगाव,मुरमाळी,येथील नागरीकांना मुल येथे यावे लागत होते.शासनाने प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड अत्यावश्यक केले आहे. त्यासाठी ग्रामीण,शहरामध्ये जागोजागी ई सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली. परंतु तरीही नागरिकांना आधार कार्ड संबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाने तालुकास्तरावर असणा-या शासकीय तलाठी कार्यालयात,ग्रामपंचायत कार्यालय चिखली येथे आधार सेवा केंद्र सुरू केले आहे.

चिखली येथील शासकीय कार्यालयात या आधार सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.येथे प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य आहे. तसेच काढलेल्या कार्ड मध्ये जन्मतारीख,लिंग,पत्याचा रहिवासी सबंधी ,लहान बालकांचा,मोबाईल क्रमांक, वेळोवेळी दुरूस्ताही करावी लागते. आता चिखली गावातील आजूबाजू परीसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

आधार अपडेट करणे तसेच आधार माहितीमध्ये सुधार,नवीन आधार नोंदणी व अद्ययावत सेवा उपलब्ध राहणार आहे.आधार कार्ड मध्ये पत्ता,नाव,जन्मतारीख,फोटो,लिंग,आदी बदलांसाठी पैसे द्यावे लागत असत.पत्ता बदलण्यासाठी रूपये आकारले जात होते,परंतु या बदलासाठी आता केवळ ठरावीक रक्कम घेतली जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांना या आधार सेवा केंद्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन आधार सुपरवायझर अक्षय मडावी संचालक पराग खोब्रागडे यांचे कडून करण्यात येत आहे.