मूल तालुक्यातील सोमनाथ येथे १५ ते २२ मे ‘भारत जोडो’ श्रमसंस्कार छावणी

59

मूल : युवाशक्तीची अपरंपार ऊर्जा सामाजिक कार्यात लागून बलशाली भारताच्या निर्मितीत त्यांचा हातभार लागावा, या दृष्टीने युवकांना सर्वकष मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने श्रद्देय बाबा आमटे यांच्या प्रेरणेन कार्यान्वित झालेली या वर्षीची भारत जोडो श्रमसंस्कार छावणी कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर मूल तालुक्यातील सोमनाथ येथे १५ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मानवाधिकाराचे खंदे पुरस्कर्ते बाबा आमटे यांनी कुष्ठरूग्णांची सेवा आणि अपंगाचे मानसिक, सामाजिक व

आर्थिक पुर्नवसनाचे कार्य करण्यासाठी निर्माण केलेल्या महारोगी सेवा समिती वरोराच्या वतीने दरवर्षी श्रमसंस्कार छावणीचे आयोजन केल्या जाते. मागील दोन वर्षाच्या खंडानंतर १५ ते २२ मे च्या रखरखत्या उन्हाच्या कालावधीत भरणारी श्रमसंस्कार छावणी आजपर्यंत अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली आहे. पहाटे उठून भारत जोडोच्या जयघोषात केलेले श्रमदान, विविध तज्ज्ञ आणि अनुभवी मान्यवरांची विविध विषयावरील प्रेरणादायी मार्गदर्शन आणि चर्चा, सुप्त कलागुणांचा अविष्कार प्रगट करण्यासाठी खेळ, संगीत व सांस्कृतिककार्यक्रमाची मेजवाणी अशी दिनचर्या असलेली श्रमसंस्कार छावणी तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पात भरत आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली श्रमसंस्कार छावणीत देश- विदेशातील हजारो युवक बाबा आमटेंच्या कार्याने प्रेरीत होवून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे कार्य करीत असून आजपर्यंत देशभरातील १५ हजाराचे वर युवक- युवतीनी बाबा आमटेंच्या विचारांची प्रेरणा घेवून समाजात विधायक कार्याला वाहुन घेतले आहे. श्रध्देय बाबा आमटे यांचा वारसा ते ७९ वयातील ५० समर्थपणे चालविणारे कौस्तुभ आमटे आणि पल्लवी आमटे यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या छावणीचे उद्घाटन १५ मे रोजी सकाळी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होणार आहे.

आंतर भारती भारत जोडो अभियान या संकल्पनेवर आधारीत ही छावणी यावर्षी देशभरातील युवकांना नवा संदेश देणार आहे. छावणीचे काळात डॉ. सोमनाथ रोडे, केतकी घाटे, अमीता देशपांडे, अंशु गुप्ता, मंदार भारदे, याशिवाय भारत जोडो अभियानातील सहयात्री तसेच आनंदवनातील ज्येष्ठ कार्यकर्ते छावणीत सहभागी शिबिराथ्थ्यांना मार्गदर्शन करणार असून शिबिर प्रमुख म्हणून रवींद्र नलगंटीवार आणि अरूण कदम छावणीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.