मुलींची पायपीट थांबणार,जनसेवा विद्यालयात सायकल वितरण कार्यक्रम

33

मानव विकास मिशन योजने अंतर्गत जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथे विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. सदर योजने अंतर्गत विद्यालयातील वर्ग 8 वी आणि 9 वी च्या एकूण 34 मुलींना सायकल वितरण कार्यक्रम आज दि. 14 मे 2022 रोज शनिवार ला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सौ. वनिता ताई वाकुडकर , सरपंच ग्रा. प. दिघोरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. एकनाथ पाल अध्यक्ष शा. व्य. समिती, मा. श्री. शंकर वाकुडकर उपसरपंच ग्रा. प. दिघोरी, मा. नागेंद्र पुपरेड्डीवार, मा. उमेश राऊत , सौ. व्याहाडकर, मा. गिरीधर शेंडे, मा. मोहन कुळसंगे , मा. खडसंग मॅडम आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. मनोज अहिरकर हे होते.
मानव विकास मिशन योजनेची माहिती मा. अहिरकर सर यांनी आपल्या प्रस्ताविकेतून दिले. पालकांच्या , विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थ्याच्या उपस्थितीतीत विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रांचालन मा. उंदिरवाडे सर यांनी केले तर आभार मा. संजय अहिरकर सर यांनी मानले.