राशन दुकानासमोर शेड उभारणी करण्यात यावी – दीपक देशपांडे जिल्हा संघटक अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर.

45

चंद्रपूर(प्रतिनिधी)
अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर च्या वतीने मान.जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचेकडे एक निवेदन सादर करीत पावसाळ्यात राशन धान्य दुकानांसमोर पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी ग्राहकांना सोयीचे होईल यादृष्टीने राशन दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर शेड उभारणी करण्यात यावी अशी सुचना देऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एक निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर चे जिल्हा संघटक दीपक देशपांडे यांच्या या निवेदनावर तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांनी मान्य केले असून तशा सुचना राशन दुकानदारांना देण्यात येणार आहेत.ही मागणी प्रत्यक्षात अंमलात आणली तर ग्राहकांना होणारा नाहक त्रास कमी होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया दीपक देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली आहे.