पंचायत समिती मुल येथील डेमो हाऊस व कॉप शॉप चे उद्घाटन

67

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प पंचायत समिती मूल येथे महाजीविका अभियांनाची सुरुवात करण्यात आली असून त्या अंतर्गत तालुका स्तरीय राणी हिराई रूरल मार्ट व सेंद्रिय निविष्ठा केंद्राचे उदघाटन आज दिनांक 12 मे 2022 मा. श्री. सुनील कारडवार , गट विकास अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मूल येथे उमेद अभियानाचे काम मोठया प्रमाणात सुरू असून अभियानाची प्रभावी अमलबजावणी करिता अधिकारी व कर्मचारी वर्ग नेहमी तत्पर असतो तालुक्यात अभियानाच्या माध्यमातून नानाप्रयोग करण्यात येत असू ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध व्यवसाय तालुक्यातील महिला करीत आहे अश्या ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच ग्रामीण भागातील निर्मितीत वस्तूची जाहिरात व्हावी त्या वस्तुंना योग्य बाजारपेठ आणि भाव मिळावा व समूहातील महिलाचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने उपजीविका अभियान सुरू करण्यात आले आहे.

 

 

 

या उपजिवीका वर्षाचे औचित्य साधून मा. डॉ. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने पंचायत समिती आवारात उमेदीच्या माध्यमातून तालुका स्तरीय राणी हिराई रूरल मार्ट व सेंद्रिय निविष्ठा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर तालुकास्तरीय कॉप शॉप मध्ये विविध स्वयंसहायता समूहाचे उत्पादित माल जसे ब्लॅक राईस, ऑरगॅनिक राईस, ड्राय फिश, मशरूम पासून तयार केलेले विविध पदार्थ, चकली, कुरुडी, पापड तसेच बांबू पासून तयार केलेल्या विविध कलाकृती जसे जहाज, टोपली, गुलदस्ता तथा विविध शोकेस च्या वस्तू तसेच सुगंधी अगरबत्ती तसेच Nretp प्रकल्प च्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेले सेंद्रिय शेती करिता उपयुक्त गांडूळखत, ब्रह्मास्त्र आणि दशपर्णी अर्क, दाना मिश्रण इत्यादी कल्चर उपलब्ध होते उपलब्ध होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. किशोर चौधरी, कृषी अधिकारी, पंचायत समिती मूल, श्रीमती. जगताप मॅडम, Cdpo,पंचायत समिती मूल, सौ स्वातीताई आयलनवार, अध्यक्षा यशस्वी प्रभागसंघ चीरोली, सौ सुवर्णा आकनपल्लीवर,अध्यक्षा, तुलशी प्रभागसंघ बेंबाळ, सौ आरिफा भसारकर, अध्यक्षा, वृंदावन प्रभागसंघ डोंगरगाव, श्री. नितीन वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक, श्री. प्रकाश तुरानकर ,तालुका व्यवस्थापक, श्री. वसीम काझी प्रशासन व लेखा सहा, कु. जयश्री कामडी , तालुका समन्वयक, श्री. स्नेहल मडावी तालुका समन्वयक (सें शेती), श्री. अमर रंगारी , प्रभाग समन्वयक,सौ. संगीता शिंदे, प्र. स. श्री. रुपेश आदे प्रभाग समन्वयक, श्री.मयूर भोपे, डे. ए. ऑप. ,श्री. मयूर गड्डमवार cam सौ. भावना कुंभरे, प्रभाग संघ व्यवस्थापक तसेच अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.