युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

49

पोटाच्या आजारावर औषधोपचार करूनही आजारातुन मुक्ती मिळत नाही, म्हणून एका उच्च शिक्षीत युवकाने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील कांतापेठ येथे घडली. सुरज नानाजी मांदाळे, वय २३ असे मृत युवकाचे नांव असून तो एम.काॅम. झाला होता. आई आणि वडील तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गांवालगतच्या जंगलात गेल्याची संधी साधून सुरजने आत्महत्या केल्याने गांवात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. नेहमी प्रमाणे आई आणि वडील पहाटेच्या सुमारास तेंदुपत्ता गोळा करण्यास गेले.

तेंदुपत्ता गोळा करून सकाळी ९ वाजताचे सुमारास घरी परतले तेव्हा घराच्या मधल्या खोलीत सुरजने गळफास घेतल्याचे दिसून आले. लागलीच घटनेची माहिती चिरोली आणि मूल पोलीसांना देण्यांत आली. ठाणेदार सतिशसिंह राजपुत आणि चिरोली पोलीस चौकीचे सुरेश ग्यानबोनवार यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व पार्थीव शवविच्छेदना करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे आणले.

मृतक सुरजला पाच वर्षापासून पोटाचा त्रास होता. पोटाचा आजारावर निदान होण्यासाठी त्यांने मोठया प्रमाणांत औषधोपचार केला परंतू आजार बरा होत नसल्याने कंटाळुन जीवन संपविले. त्याचे पश्चात वृध्द आई वडील आणि मोठा भाऊ आहे