साई मित्रपरिवार व संस्कार कलश ग्रुप मूल यांच्यातर्फे पानपोई चे उदघाटन

35

श्री साई मित्र परिवार मूल व संस्कार कलश ग्रुप मुल तर्फे तहसील कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थंडगार पाण्याची पानपोई लावण्यात आली. उन्हाचा तडाखा वाढत आहे. ऊन 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढत असल्याने अंगाची लाहीलाही निर्माण होत आहे.

मूल तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध शासकीय कामासाठी शेतकरी,शेतमजूर कामगार व नागरिक येत असतात. अशा परिस्थितीत विकत पाणी घेऊन पिणे हे ग्रामीण भागातील नागरिकांना न परवडणारे आहे. तहसील कार्यालयाजवळ पाणपोईचे अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात येताच मूल येथील सामाजिक संस्था ही साई मित्रपरिवार मूल व संस्कार कलश ग्रुप मूल यांच्यातर्फे  महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे अवचित्त साधून पानपोई लावण्यात आली.

तहसील कार्यालय परिसरात पाणपोईची सोय केल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाटसरू, नागरिकांनी आपली तहान भागवत आयोजकांचे आभार मानले.

या पानपोई चे उदघाटन संस्कार कलश च्या जयश्री चनूरवार, श्रीसाई मित्र परिवारचे अध्यक्ष विवेक मुत्यलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री साई मित्र परिवारचे धनराज कुडे, संदीप मोहबे, बंडू साखलवार, पंकज महाजनवार, अमित राऊत, संदीप आलेवार, नाना कीर्तिवार, मुकेश गोवर्धन, रितिक पोगुलवार,नितीन अलगूनवार,मनीषा मुत्यलवार, प्रिया आलेवार, प्रियंका राऊत, कुमुदिनी भोयर तसेच संस्कार कलशच्या अध्यक्षा जयश्री मुस्तीलवार, उपाध्यक्षा श्वेता चिंतावार, सचिव सीमा बुक्कावार,कोषध्यक्षा संजीवनी वाघरे,कल्पना मेश्राम,सुजाता बर्डे,मीनाक्षी छोणकर,वंदना बुक्कावार,प्रीती चिमड्यालवार, आदी उपस्थित होते.