मुल येथे शेतकऱ्यांसाठी पाणपोईचे उद्घाटन

81

श्रीकृष्ण ग्रुपच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पाणपोईचे उद्घाटन

मूल येथील सामाजिक राजकीय चळवळीची दखल घेणारे सामाजिक राजकीय चळवळी वर चर्चा करणारे प्रसिद्ध श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने आज कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर असलेल्या रोजच्या भाजीबाजारात शेतकऱ्यांकरिता पिण्याच्या थंड आणि स्वच्छ पाण्यासाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ ,श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुपचे संचालक किशोर कापगते, पब्लिक पंचनामा चे संपादक विजय सिद्धावार, लोकमतचे प्रतिनिधी भोजराज गोवर्धन, शेतकरी हितचिंतक मंगेश पोटवार, गौरव श्यामकुळे, राकेश ठाकरे, महेश गाजुलवार संतोष पालांदूरकर, प्रमोद कोकुलवार, श्याम उराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 गुरुदास गिरडकर यांनी,  श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुपवर कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानात बाजार भरत असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याची बाब चर्चेला आणली होती, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना महागडे उसाचे रस घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत, श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुप मे आज या ठिकाणी पाणपोईचे सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यापूर्वीही श्रीकृष्ण ग्रुप ने अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विशेषत: कोरोना मध्ये ही मुल येथील रुग्णांना मदत होईल यादृष्टीने या ग्रुपचा वापर केला होता. एखादा व्हाट्सअप ग्रुप सामाजिक कार्यात कसे योगदान देऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून श्रीकृष्ण ग्रुप चे कार्य पुढे येत आहे.