चंद्रपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने तक्रारींचा जलद निपटारा

34

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने मागील वर्षी १एप्रिल २०२१ ते ३१मार्च२०२२ या कालावधीत ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर कार्यवाही व सुनावणी करुन न्यायनिवाडा करण्यात आलाआहे, त्याची आकडेवारी खालिल प्रमाणे आहे.
दाखल प्रकरणे ६५९४, निपटारा करण्यात आलेली प्रकरणे ६०१९आणि सुनावणी सुरू असलेली प्रकरणे ५७५ तर

सुनावणी पूर्ण होऊन अंमलबजावणी करणे साठी ग्राहकांकडून दाखल प्रकरणे८१३, त्यावर कार्यवाही करीत अंमल करीत ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आलेली प्रकरणे ६६५ तर अजून कार्यवाही सुरू असून ती पूर्ण व्हायची आहेत अशी प्रकरणे आहेत फक्त १४८.

अशारितीने ग्राहकांना त्वरित न्याय मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे व आयोगाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे,आतातर आयोगाच्या वतीने तक्रारदार व ज्याचे विरोधात तक्रार आहे अशी व्यक्ती यांचे मध्ये मध्यस्थी करण्याची व प्रकरण तडजोडीने सोडवण्याची सोयही ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात करण्यात आली आहे त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे न्यायनिवाडा करणे सोयिस्कर होणार आहे.

यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर चे अध्यक्ष अतुल अळशी आणि आयोगाच्या दोन महिला सदस्यांनी ग्राहकांच्या तक्रारींची सुनावणी व सोडवणुक करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया कायदेशीर रीत्या पूर्ण करुन न्याय मिळवून दिला आहे. याकरिता अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करीत आभार व्यक्त करीत आहे. आणि ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्मीतीचा मुख्य उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केल्यानंतर त्यात दुरुस्ती करून त्यानुसार कमी काळात कमी खर्चात ग्राहकांना न्याय मिळावा म्हणून केलेल्या उपाययोजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचे ही आभार व्यक्त करीत आहे.
असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दीपक देशपांडे जिल्हा संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी कळविले आहे.