लोकनेते विकासपुरुष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारनाने मुल येथे फुटपाथ वरील छोटे व्यवसायिक यांना थंड पिण्याच्या पाण्याचे कुल जार वाटप चे शुभारंभ.

36

मुल येथे मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरात आज दि.२६/४/२०२२ रोज मंगळवार ला भाजपा नेते मा.श्री हरिश शर्मा माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत फूटपाथ वरील छोटे व्यवसायिक यांना या रणरणत्या उन्हात एक सस्नेह भेट म्हणुन थंड पिण्याच्या पाण्याकरिता कुल जार वाटप चे शुभारंभ करण्यात आले.

जनसेवा हिच ईश्वर सेवा या भावनेतून भारतीय जनता पार्टी आदरणीय सुधीर भाऊ यांच्या मार्गदर्शनात सदैव अनेक उपक्रमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजात कार्यरत असते.जनतेचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद या लोकसेवेतून प्राप्त करणे हाच प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांचा मानस आहे.

या प्रसंगी मूल शहर भाजपा नेते श्री प्रभाकर भोयर,श्री नंदु रणदिवे, सौ.रत्नमालाताई भोयर,श्री चंद्रकांत आष्टनकर,श्री प्रशांत समर्थ,श्री अनिल साखरकर,श्री महेन्द्र करकाडे,श्री प्रशांत बोबाटे,श्री दादाजी येरणे,श्री रवि बर्डे,श्री राकेश ठाकरे,श्री सुनील आयलनवार,सौ.अर्चनाताई चावरे,सौ. प्रभाताई चौथाले,सौ. कल्पनाताई मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.