पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त

51

शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२२ साठी शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या २० जुलै रोजी ही परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांनी सटकेचा नि:श्वास सोडला
आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शासनाकडून विनर कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, टीईटी घोटाळ्यात कंपनीचे नाव आल्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु, कंपनीने न्यायालयात शासनाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. 
न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे च्या सहकार्याने नियोजन करून येत्या २० जुलै रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे.
पुन्हा एक संधी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. दि. २३ ते ३० एप्रिल या कालावधीत विद्यार्थी नोंदणी व शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.