राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने संजय पडोळे सन्मानित

37
मूल :- येथील जेष्ट पत्रकार, पुण्यनगरी या प्रादेशिक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आणि सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,शैक्ष्णिक,राजकीय क्षेत्रातील अग्रणी संजय पडोळे यांना यंदाच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळा नाशिक येथे  बुधवारी घेण्यात आला. हा पुरस्कार सोहळा नाशिक येथिल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पार पडला.यानिमित्त अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2022 चे आयोजन करण्यात आले होते. राष्टीय एकात्मता,सामाजिक समता,सहिष्णुता आणि गुणवत्ता या त्रिसुत्रीच्या आधारे जेष्ट पत्रकार संजय पडोळे यांची या पुरस्कारासाठी  निवड करण्यात आली.अनेक दशकांपासून संजय पडोळे पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत.सामाजिक बांधलकी जोपासून त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे.त्याचबरोबर येथील सामाजिक,
शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य अतूल्य आहे.या क्षेत्रात ते नेहमिच अग्रेसर असतात.  मॉ दुर्गा मंदिर आणि कलानिकेत या सांस्कृतिक संस्थेचे संचालक आहेत. राष्टपिता महात्मा गांधी महाविदयालयात ते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
नाशिक शहरातील सांस्कृतिक सभागृहात महापरिषदेचे समन्वयक आणि पत्रकार प्रकाश सावंत आणि समारंभाध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ मनिषा कदम यांच्या हस्ते संजय पडोळे यांनी पुरस्का स्वीकारला.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,गौरवपदक आणि महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबददल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, संदिप गडडमवार,बाळा पाटिल संगीडवार, सभापती घनश्याम येनूरकर,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार,कला निकेतनचे अध्यक्ष आणि  मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे,सामाजिक कार्यकर्ते गुरू गुरनूले,विनायक रेकलवार, तालुका पत्रकार संघ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.