जि.प. प्राथ. शाळा चांदापूर हेटी येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

32

आज दिनांक 18/04/2022 रोज सोमवारला जि.प. प्राथ. शाळा चांदापूर हेटी येथे शाळापूर्व तयारी मेळावा ( पहिला ) उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे उद्घाटक मा . दिपकभाऊ नागापूरे ( अध्यक्ष शा . व्य . स) सहउद्घाटक मा.सौ. मंगलाताई चिंचेकार तर अध्यक्ष म्हणून मा . प्रफुल तिवाडे ( सदस्य ग्रा.पं. चांदापूर ) प्रमुख पाहुणे मा .सौ. संध्याताई फाले ( सदस्या ) मा. श्री . जिवनदास पा . मशाखेत्री उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवातीला प्रभातफेरीने करण्यात आली . त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .पाहुण्यांच्या स्वागतानंतर मा . भुरसे सर यांनी प्रास्ताविक केले . श्री शेरकी सरांनी कार्यक्रमाचे संचालन केले . त्यानंतर पाहुण्यांचा हस्ते फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . पाहुण्यांना १ते ७ टेबलांची माहिती देण्यात आली .व लगेचच विद्यार्थ्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली .विद्यार्थ्यांनी व पालकांनी मेळाव्यात यशस्वी सहभाग दर्शविला . सोबतच इतर वर्गांच्या पालकांनी सुद्धा सहभाग दर्शविला . शेवटी मा .वर्षाताई पाल ( अंगणवाडी शिक्षिका ) यांनी पाहुण्यांचे आभार मानले .व पाहुण्यांना आणि पालकांना नास्ता व चाय देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवकांनी सहकार्य केले .