जातीचा दाखला कसा काढतात ? आॅनलाईन दाखला मिळविण्यासठी किती पैसे लागतात ?

39

शिक्षण,नौकरी वा अन्य शासकीय आरक्षणातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे.एस.टी.एस.सी.एन.टी.एस.बी.सी.ओ.बी.सी आणि इतर प्रवर्गासाठी जातीचा दाखला दिला जातो. पण कधी अमुक कागदपत्रे नाहीत म्हणून तर कधी चुकीच्या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे कित्येक जणांना शासकीय कार्यालयांचे आपले सरकार केंन्द्राचे उंबरे झिजवावे लागतात. अशा हेलपाटयांपासून मुक्तता करण्यासाठी माहिती असो.

कोणती कागदपत्रे लागतात ?

ओळखीचा पुरावा (किमान 1):- पॅन कार्ड,पासपोर्ट,ड्रायव्हिंगलायसन्स,मनरेगा जाॅब कार्ड,शासकीय किंवा निमशासकीयसंस्थांनी जारी केलेले ओळखपत्र.
पत्याचा पुरावा:- (किमान 1) पासपोर्ट,पाण्याचे बिल,रेशनकार्ड,आधार कार्ड,मतदार ओळखपत्र,टेलिफोन बिल,वीज बिल,मालमत्ता कराची पावती
इतर कागदपत्रे:- जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र,स्वतःअथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा (अनुसूचित जाती आणि जमातीसाठी -1950 पूर्वीचा,
विशेष मागसवर्ग ,विमुक्त जाती व भटक्याजमातीसाठी -1961 पूर्वीचा,इतर मागास वर्ग,1967पूर्वीचा.

विवाहित महिला असल्यास:-

विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा,विवाहाचा पुरावा-विवाह नोंदणी प्रमाणपत्र,आणिराजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना,अर्जदारानेअन्य राज्य/जिल्हयामधून स्थलांतर केले असल्यास त्याराज्य/जिल्हयातील सक्षम प्राधिका-याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र,धर्मांतरकेले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा.

दाखला मंजूर कोण करतात ?

सर्वप्रथम अर्ज नायब तहसीलदारांच्या कार्यालयात जातो.तेथे अर्जाची पडताळणी करून तहसीलदारांकडे पाठविलाजातो.तपासणी करून ते अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवतात. अर्ज उपविभागीय कार्यालयात आल्यास पडताळणी करून दाखला मंजूर केला जातो. त्रुटी असल्यास माघारी अर्जदाराकडे किंवा आपले सरकार स्ेंावा केंन्द्राकडे पाठविला जातो. त्यानंतर संबंधित त्रुटी पुर्ण करून पुन्हा अर्ज पुढे पाठवता येतो.

जातीचा दाखला कशासाठी लागतो ?

सरकारी नौकरीत आरक्षण,शाळा-महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्येपूर्ण किंवा ठरावीक सूट,शैक्षणिक पूर्ण किंवा ठरावीक सूट,शैक्षणिकसंस्थेत प्रवेश कोटा,सरकारी नोकरीच्या वयोमर्यादेत अतिरिक्त सूट,शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी

किती पैसे लागतात ? 33.60 रू प्रतिज्ञापत्रसह 58.00 रूपये पावती बघून घ्यावी.

कुठे काढतात ? आपले सरकार सेवा केंन्द्र,तालुका किंवा जिल्हा कार्यालयातील सेतू सुविधा केंन्द्र,आपले सरकार संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने