ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

40

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मुल शहरात,तालुक्यात,संस्था,संघटना,राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रम आयोजित करून साजरी केली. मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्यांने ठिकठिकाणी अभिवादन,सभा,व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळच्या सुमारास ढोलताशे व डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

=============================================================================

भारतीय जनता पार्टी मूल च्या कार्यालयात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी मूल च्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘झिंदाबाद’ च्या घोषणा ही देण्यात आल्या. या कार्यक्रमाला भाजपा चे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर ,सरचिटणीस चंद्रकांत आष्टनकर, न.प.चे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे,सरचिटणीस अजय गोगुलवार,माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे ,अनिल साखरकर,मिलिंद खोब्रागडे, विनोद सिडाम, राकेश ठाकरे,प्रज्योत रामटेके,नंदू भाऊ कागदेलवार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

================================================================================

ग्रामपंचायत नांदगाव कार्यालयात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

या प्रसंगी सरपंच अॅड हिमानी दशरथ वाकूडकर ,ग्रा.प.सदस्य,तसेक कर्मचारी व गावातील नागरीक उपस्थित होते.

—————————————————————————————————————————————–

तालुका कांग्रेस कमिटी मुल तर्फे भारतरत्न महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुल- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,शहर कांग्रेस, युवक कांग्रेस,ओबीसी कांग्रेस,किसान कांग्रेसच्या वतीने घेण्यात आला. कांग्रेसचे सक्रिय नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे हस्ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते बंदुभाऊ गुरनुले, ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, संचालक किशोर घडसे, शांताराम कामडे, गणेश रणदिवे, माजी नगर सेविका ललिता फुलझेले,विनोद कामडे,माजी उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार, संचालक विवेक मुत्यलवार, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, अनवर शेख, ज्योत्स्ना पेंदोर,सुनील शेलेकर,आकाश वाकुडकर,लक्ष्मी लाडवे,अल्का कामडे,श्यामला बेलसरे, संगीता भोयर, चंद्रकांत चतारे,यांचेसह कांग्रेसचे शहर व ग्रामीण विभागातील अनेक कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.

————————————————————————————————————————————–

महामानवांच्या जयंतीनिमीत्य ‘‘बाबासाहेब’’ पुस्तकांचे वितरण

स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनामुळे नागरीकांनी मानले आयोजकांचे आभार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातुन घरोघरी  पोहचावे यासाठी मूल येथील मित्र मंडळी मिळुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकांचे वितरण 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने करण्यात आले, 
मूल येथील बस स्थानकाजवळील साई लॉजच्या समोर मित्र परिवारांच्या पुढाकारातुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकाच्या वितरण सोळल्याला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्वलकुमार इंदुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे, मूल नगर पालीकचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, राकेश रत्नावार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंगलाताई आत्राम, मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय पडोळे, माजी सचिव राजु गेडाम, मूल नगर पालीकेचे माजी नगरसेवक विनोद कामडी, अॅड. भडके, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यालवार, भाजपा ओबीसी सेलचे नेते राकेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मूल येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोटवार, प्रदिप वाळके, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक भोजराज गोवर्धन, यांच्या पुढाकारातुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकोचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, पंकजकुमार संपादक असलेल्या ‘‘बाबासाहेब’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (व्यक्ती आणि वाडमय) या पुस्तकोच्या सुमारे 200 प्रती यावेळी वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन मंगेश पोटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी  दिपक घोंगडे, मनोज जांभुळे, गौरव शामकुळे, महेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
=============================================================================

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मुल शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुमित सुरेशराव समर्थ, विधानसभा अध्यक्ष बल्लारपूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसन वासाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल , भास्कर खोब्रागडे शहर अध्यक्ष मुल, ज्ञानेश्वर वाघमारे तालुका महासचिव, प्रभाकर धोटे, हेमंत सुपणार ,शहर महिला कार्याध्यक्ष सौ. भाग्यश्री तागडे उपस्थित होते.
 सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुमित समर्थ यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महामानव डॉ बाबासाहेब  आंबेडकर ह्यांचे  विचाराचे वाचन फक्त भारत देशात नव्हे तर संपूर्ण विश्वात वाचन चालू आहे.बाबासाहेबांचे विचाराचे वाचन करणे ही काळाची गरज आहे. महामानवाचे विचार घरा घरा पर्यंत पोचवा असे मार्गदर्शन सुमित समर्थ यांनी केले.
सदर कर्यक्रला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  पदाधीकारी दुष्यांत महाडोळे, संदीप तेलंग, प्रदिप देशमुख, सतीश गुरूनुले, अक्षय वाकडे, राहुल बारसागडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संदीप तेलंग यांनी केले तर आभार प्रदर्शन दुष्यंत महाडोळे यांनी केले.
================================================================================

आपच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

मूल येथील आम आदमी पार्टीचे कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार, तर प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी पार्टीचे मूल तालुकाध्यक्ष अमित राऊत, महिला आघाडीच्या अध्यक्षा कुमुदिनी भोयर आदी उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आपचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार विचार व्यक्त करताना महामानव डॉक्टर आंबेडकर यांचे विचारावर आम आदमी पार्टी काम करीत आहे. असे मनोगत व्यक्त केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळेच आज वंचित घटकाला ताठ मानेने उभे राहता येत आहे, वंचित घटकाला त्यांचे न्याय हक्क मिळत आहे. आम आदमी पार्टी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच काम करीत  असून शिक्षण आणि आरोग्यावर भरीव काम करीत असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन विशाल नर्मलवार तर आभार प्रदर्शन महेश दूधबळे यांनी केले. कर्यक्रमाचा शेवट राष्ट्रागीताने करण्यात आला.
===============================================================================

सक्सेस काॅम्युटर्स मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

मुल येथील एकमेव सरकारमान्य संगणक प्रशिक्षण संस्था MKCL मान्यताप्राप्त सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन येथे दरवर्षी प्रमाणे भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिना निमित्त्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या मुख्य प्रशिक्षक कु.सुजाता तावाडे तथा संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झालां . या कार्यक्रमाला प्रथम महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला पुष्पहार वाहण्यात आला त्यानंतर कु.सुजाता तावाडे मॅडम व संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांनी आपले विचार प्रकट केले. MSCIT चे विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.