शासकीय कार्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट

36

मूल:-भीम जयंती उत्सव समिती तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मागील दोन वर्षात कोरणा संकट संपूर्ण जगात असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हर्ष उल्हासात साजरी करता आली नाही त्यामुळे जयंतीच्या पूर्वसंध्येला नगरपरिषद मुल, पोलीस स्टेशन मूल आणि उपजिल्हा रुग्णालय मूल कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळेस नगर परिषदेत मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी ही प्रतिमा स्वीकारली पोलीस स्टेशन मूल येथे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत तर उपजिल्हा रुग्णालय मूल डॉ. उज्ज्वल इंदुरकर यांनी प्रतिमाचा स्वीकार केला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देताना भीम जयंती उत्सव समितीचे सदस्य काजू खोब्रागडे, सुरेश फुलझेले,अतुल गोवर्धन,डेविट खोबरागडे, शैलेश वनकर, कुमार दुधे,सुजित खोबरागडे,मुन्ना देव,सिद्धार्थ रामटेके, आदी उपस्थित होते.