समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

47

तालुक्यातील विविध शाळा,महाविद्यालयात तसेच शासकीय कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिर्मित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध उपक्रमही राबविण्यात आले.मुल माळी समाज तर्फे महात्मा ज्योतिबा फुले चौक मुल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुल नगर परिषद चे मुखधिकरी सिध्दार्थ जी मेश्राम साहेब व मुल पोलीस स्टेशन चे निरीक्षक राजपूत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मल्यारपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विजय लोनबले, जिल्हा अध्यक्ष समता परिषद चंद्रपूर, सुमित भाऊ समर्थ, विधानसभा अध्यक्ष बल्लारपूर, नंदुभाऊ रणदिवे माजी नगर परिषद उपाध्यक्ष, माजी नगरसेवक चंद्रकांत अष्ठानकर,माजी नगरसेवक प्रशांत समर्थ,सुरेश फुलझले, भास्कर खोब्रागडे,,सुधीर नागोशे,राकेश ठाकरे,,आदे सर, काजू खोब्रागडे, डेव्हिड खोब्रागडे, फुलझले सर, प्रवीण मोहूर्ले, सुजित खोब्रागडे, सुनील महाडोरे, प्रदीप शेंडे, सौरभ वाढई, शुभम निकुरे, टेकचंद महाडोरे, प्रतीक आसंवार, रवी गुरनूले,संकेत शेंडे,प्रतीक गुरनुलेउपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती बाबत प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ओमदेव मोहुर्ले यांनी केले तर आभार राकेश मोहुर्ले यांनी मानले.