महसूल कर्मचा-यांच्या संपामुळे कामकाज प्रभावित

44

शासनाकडे प्रलंबित मागण्या संदर्भात महसूल विभागाचे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे, याशिवाय शासकीय कामकाजही प्रभावित झाले आहेत. या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना माघारी परतावे  लागत आहे.महसूल कर्मचारी संपामुळे  एरवी गजबजलेल्या कार्यालयातही सध्या शुकशुकाट आहे.

त्यात मुल तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय वेगळे नाही. शासनाकडे प्रलंबित मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही ,तो पर्यंत उपोषण सोडणार नाही,अशी भुमिका कर्मचा-यांनी सोमवारपासून घेतली आहे. त्यामूळे सोमवारपासून बेमूदत संपावर कर्मचारी असल्याने,नागरिकांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.                                                                                     या उपोषणामुळे कार्यालयातील काम प्रभावित झाले असून ,नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे.कामासाठी आलेल्या नागरिकांनामध्ये मात्र नाराजी दिसून आली.ही कामे खोळबंली:- संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या लाभाथ्र्यांना उन्हातच परत फिरावे लागते.रोजगार हमी योजना,महसूल निवडणूक नैसगिक आपत्ती,सर्व विभागातील खुच्र्यासंपाच्या दिवशीही रिकाम्या दिसून आल्या.