मूल पंचायत समितीच्या वतीने सांस्कृतिक स्पर्धा

38

मूल:- जिल्हा स्तरावरील सुचनेनुसार मूल पंचायत समिती च्या वतीनेविविध सांस्कृतीक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
शासकीय कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे सुचने नुसारमुल पंचायत समितीमधील आरोग्य विभाग व शिक्षण विभाग मधिलकर्मचा-यांनी अत्यंत उत्फुर्त सहभाग दर्शविला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी सुनील कारडवार
यांचे हस्ते तर गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांचे अध्यक्षतेखाली वैद्यकिय अधिकारी सुमेध खोब्रागडे,मनसुखलाल गोंगले,प्रियंका रायपुरे,आरती जगताप,विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख भाकरे,सौ,गुज्जनवार मॅडम,यांचेप्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

          आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तीक गायण,वैयक्तीक नृत्ये,समुह नृत्य,पतनाटय,या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.वैयक्तिक गायण स्पर्धेत विजय बावणे प्रथम मोहमद कुरेशी व्दितीय,प्रेमदास सुरपाम तृतीय,वैयक्तीक नृत्य सुषमा शिरभय्ये,समूहनृत्य स्पर्धा,अल्का बुरांडे आणि गुप भेजगाव,तर पथनाटय आरोग्य उपकेंन्द्र जुनासुर्लायांनी पटकावीला.कोविड-19 ची एकंदरीत भयावह परिस्थिती व त्यावरीसरकारी यंत्रणायावर उत्तम सादरीकरणाबदल प्रंशसा करण्यात आली.आरोग्य सेविका बोलीवार यांनी उत्कृष्ठ गायणाबदल पारीतोषीक देण्यात आले.
           तर सर्व विजेत्यांना जिल्हास्तरावर संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे संचालन विद्या कोसे तर आभार आनंद गोंगले यांनी मानले.मोठया प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते.