जात वैधता प्रमाणपत्राकरीता उमेदवारांना त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन

51

चंद्रपूर दि. 6 एप्रिल : 27 मार्च 2022 अखेर शैक्षणिक, सेवा व निवडणुकीकरीता चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांना अद्यापपर्यंत अपूर्ण दस्तऐवजाअभावी जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा संबंधित व्यक्तिंना त्रुटीसंदर्भात ई-मेल पाठविण्यात आला असून त्रुटीपूर्ततेसाठी पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे.

परंतु जे अर्जदार, उमेदवार ई-मेल आणि त्रुटीबाबत अनभिज्ञ आहे, अशा अर्जदारांनी त्रुटी पूर्ततेकरीता  दि. 6 ते 7 एप्रिल, 19 ते 21 एप्रिल किंवा 26 ते 28 एप्रिल 2022 या कालावधीत प्रत्यक्ष कार्यालयात येऊन त्रुटीची पूर्तता करावी. त्रुटीपूर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडून फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रकरणी प्रवेशासाठी, निवडणूक आणि सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील. यास समिती जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.