धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा, मूल तालुका भाजपाची मागणी

63

धान उत्पादक शेतकरयांना बोनस जाहीर करण्यात यावा या मागणीकरिता मूल तालुका भाजपा तर्फे मुलचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, सरचटणीस चंद्रकात आष्टनकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार, माजी नगरसेवक, प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, आशा गुप्ता, दादाजी येरणे, दिलीप पाल, शुभम समर्थ आदी उपस्थित होते. पूर्व विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या धानाचा धान उत्पादक शेतकर्यांना अजुन पर्यंत त्यांच्या हक्काचा 'बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अश्या अनेक निसर्गाच्या विविध संकटात सापडलेल्या शेतकरी हैराण असताना त्यांच्या हक्काचा बोनस व धान्य विक्रीची रक्कम त्यांना न मिळाल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत असून आता आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब, सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये लोकलेखासमिती चे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदर बोनस व विक्री रक्कम तातडीने शेतकरयांना देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने धान्य विक्रीची रक्कम व बोनस देण्याचे अधिवेशनात जाहीर करावे अन्यथा हे आंदोलन पुढे शेतकरयांच्या सहभागाने तीव्र करण्यात येईल असे सांगितले.