नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मुल तर्फे जागतिक चिमणी दिवसानिमित्य पक्षी घागर वाटप

43

मुल-  शिक्षक कॉलनी मुल ,वार्ड नं. १६ येथील शिवमंदिर परिसरात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे वेळी परिसरातील बऱ्याच महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ दांपत्य श्री. व सौ.भेंडारे यांना वडाचे रोप देऊन करण्यात आली.
सभासद नोंदणी संदर्भात सांगतांना महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष तेजस्विनी नागोसे यांनी नेफडो बद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.अल्का राजमलवार यांनी पक्षी ,प्राणी हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे हे उपस्थित महिलांना सांगितले. रत्ना चौधरी नागपूर विभाग यांनी सणसमारंभ पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरे करता येतील, रुढी परंपरांना फाटा देऊन मानवता विकास कसा साधता येईल हे उपस्थितांना सांगितले.जागतिक चिमणी दिवसानिमित्त उपस्थित सर्व महिलांना संस्थेतर्फे पक्षीघागरचे वाटप करण्यात आले.काही महिलांनी समोरासमोर पक्षीघागर बांधून कृतज्ञता व्यक्त केली.तसेच नवीन सभासद नोंदणी करण्याचे आश्वासन उपस्थितांकडुन मिळाले.भेट दिलेल्या वडाच्या रोपाची जबाबदारी मंगेश नागोसे यांनी घेतली.रोपासोबतच एक ट्री गार्ड सुद्धा देण्यात आले. पुढल्या वर्षी या रोपाचं वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे असे आश्र्वासन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.प्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष, रत्ना चौधरी नागपूर विभाग सचिव, चंद्रपूर जिल्हा संघटक नागोसे सर, चौधरी सर,मुल तालुका अध्यक्षा मिरा शेंडे, उपाध्यक्षा अल्का राजमलवार, तालुका संघटिका वंदना गुरनुले, नंदा शेंडे,इंदु मांदाडे, सुनिता खोब्रागडे,निता कटकुरवार तसेच वार्डातील पर्यावरण प्रेमी महिला उपस्थित होते. संपूर्ण उन्हाळ्याभर प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी पक्षी घागर बांधून तहानलेल्या पक्षांना पाणी पाजण्याचे पुण्य करावे असा अमूल्य संदेश या उपक्रमातून देण्यात आला.