मुल तालुका शिवसेने तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

44

मूल : तालुका शिवसेने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीचे आयोजन तालुका कार्यालयात करण्यात आले. २१ मार्च रोजी सकाळी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व माल्यार्पण तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले. यावेळी उपतालुकाप्रमुख रवी शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर महाप्रसादाच आयोजन करण्यात आले. अनेक महिला -पुरूषांनी याचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूल शिवसेना तालुका समन्वयक सुशीचे सरपंच अनिल सोनुले, युवासेना तालुकाप्रमुख संदीप निकुरे, महिलाआघाडी तालुकाप्रमुख रजनी झाडे, शहरप्रमुख राहुल महाजनवार, शहर समन्वयक अरविंद करपे, उपशहर प्रमुख प्रवीण मोहु्ले, योगेश राऊत, बाला इन्नमवार, श्रीनिवास कन्नुरवार, आशिष गुंडोजवार, विजय भोयर आदी शिवसैनिक उपस्थित होते.