मूल तालुक्यातील जनतेची समस्या, मुख्यमंत्र्याना पाठविले निवेदन

32
विविध मागण्यांकरिता मूल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले.वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, विमुक्त भटक्या जमाती मधील मच्छीमार ढीवर, केवट जातीतील लोकांना घरकुल योजना लागून करण्यात यावे, गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मार्फतीने बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी, घरकुल योजनेतील निधी ग्रामीण आणि शहरी भागाला भेदभाव न ठेवता समान निधी देण्यात यावा, निराधारांना दरमहा पेन्शन योजनेची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. अश्या विविध मागण्याना घेऊन आज मूल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  माजी सरपंच मारोती शेंडे, नंदू बारस्कर यांनी निवेदन देत मागणी केली. मागणीची पूर्तता न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना भादुर्णी येथील माजी सरपंच पुष्पाताई बोरुले, मारोडा येथील ग्रामपंचायत सदस्या अर्चना उईके, कामराज कडुकर, यशवंत जराते, कविता मेश्राम, अरुणा शेंडे, सविता मेश्राम, चंद्रशेखर शेंडे, विकास रणदिवे आदी उपस्थित होते.