पं.स.मध्ये बिडीओ,जि.प.प्रशासकाची धुरा सीईओ कडे.पंचायत समित्यांची मुदत आज संपणार

38

मुल:- जिल्हयातील मुल पंचायत समितीची पंचवार्षिक  मुदत रविवार,13 मार्च,तर जिल्हा परिषदेची मुदत20 मार्चला
संपणार आहे. त्या अनुंषगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवार  दिनांक 11 मार्च रोजी राजपत्र जारी केली आहे.
यानुसार पंचायत समितीच्या प्रशासकाची जबाबदारी  स्ंाबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे तर जिल्हा  परिषदेची प्रशासकपदाची जबाबदारी मुख्य कार्यकारी  अधिकारी यांच्याकडे सोपविली आहे.

13 मार्च रोजी संपत आहे.पंचायत समितीच्या  सभापती ,उपसभापती आणि सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात
येणार आहे. त्या अनुषंगाने पंचायत समित्यांच्या निवडणुका   कालमर्यादत घेणे शक्य नाही.अशा आशयाचे निवडणूक
आयोगाच्या राज्य शासनाच्या पाठविलेल्या पत्रानुसार या  पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्त करावी,अशी  विनंती केली होती. त्याप्रमाणे ग्रामविकास विभागाने संबंधित   पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रशासक  पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.