महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती, मूल येथे जागतिक महिला दिन साजरा

36

8 मार्च 2022 रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मूल येथे पंचायत समिती सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. चंदूभाऊ मारगोनवर, सभापती, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. कारडवार साहेब, गट विकास अधिकारी, सौ. स्वाती ताई आयलनवार, प्रभाग संघ अध्यक्ष, सौ. शारदा सिडाम, प्रभाग संघ सचिव, सौ. सुशीला ताई चलाख, तसेच इतर संचालक मंडळातील महिला उपस्थित होते. ग्राम विकास विभागाकरिता महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे गरजेचे आहे यासाठी शासनामार्फत विविध योजनांचा माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा उमेद मुळे सक्रिय सहभाग वाढलेला असून कृती संगमाच्या माध्यमातून अभियानातील महिला विविध योजनेचा लाभ घेत आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून उमेद अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले तसेच सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले सदर कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात महिलांना दाखविण्यात आले तसेच राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत स्थापन झालेले यशस्वी उद्योग विकास केंद्र च्या माध्यमातून महिलांना व्यक्ती उद्योगाकरिता आर्थिक सहाय्य म्हणून यशस्वी प्रवागसंघ अंतर्गत दहा महिलांना 10 लक्ष रुपये वितरित करण्यात आले ,नवी उडान महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांना 6,50,000 /- अर्थसहाय्य वितरित करण्यात आला तसेच वृंदावन प्रभाग संघ मारोडा यांना 12 लक्ष तसेच तुळशी प्रभात संघ यांना 4 लक्ष निधी उमेद अभियानाच्या मार्फतीने वितरित करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला श्री. प्रकाश तुरानकर तालुका अभियान व्यवस्थापक,श्री. वसीम काझी प्रशासन व लेखा सहा, श्री.निलेश जीवनकर, ता.व्य. कु. जयश्री कामडी , तालुका समन्वयक, श्री. स्नेहल मडावी तालुका समन्वयक, श्री. अमर रंगारी प्रभाग समन्वयक,सौ. संगीता शिंदे, प्र. स. , श्री. रुपेश आदे प्रभाग समन्वयक, श्री.मयूर भोपे, डे. ए. ऑप. ,श्री. मयूर गड्डमवार cam सौ. भावना कुंभरे, प्रभाग संघ व्यवस्थापक तसेच अभियानातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.