जागतीक महिला दिनाच्या खास शुभेच्छा

54

महिला किंवा स्त्री म्हटले म्हणजे सध्या एक महत्वाचे स्थान निर्माण करणारी, स्वत: पुढे येऊन अनेक अडचणींना सामोरे जाणारी बाई आपल्या डोळ्या समोर उभी राहते. महिलांना सध्या एक आदराचं स्थान दिलं गेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं कर्तुत्व सिद्ध करू बघते आहे. घरसंसार असो किंवा नोकरी आपली जबाबदारी ती नेटकी पार पाडते आहे. एक संगणक संचालीका ,एक अंगणवाडी शिक्षीका,एकआशा,स्वयंसेवीका,मदनीश,गृहणी, अधिकारी, नोकरी किंवा व्यवसाय करणारी ती, आई, ताई, मुलगी, पत्नी अशा कितीतरी भुमीका निभावणाऱ्या या स्त्रीला ८ मार्च रोजी विशेष सन्मान दिला जातो. कारण जागतीक महिला दिन साजरा केला जातो. तर या जागतीक महिला दिनाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश…

“ती आहे म्हणून हे विश्व आहे
ती आहे म्हणून घराला घरपण आहे
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

“स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!”

सौ.आशू अभय उरकुडे ( आशा सुपरवायझर)